Thursday, August 28, 2014

भास्कर बी. शहा यांची स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नियुक्ती

भास्कर बी. शहा यांची स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नियुक्ती

 भास्कर बी. शहा
मुंबई – जॅब्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर बी. शहा यांची अलीकडेच स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया (एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार) मध्ये बोर्ड सदस्य म्हणून वाणिज्य मंत्रालय भारत सरकारद्वारे नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय मसाले आणि खाद्यपदार्थ निर्यातदार मंडळाचे सलग तीन वर्षांसाठी अध्यक्ष देखील होते.
जॅब्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला गेल्या 15 वर्षांमध्ये विविध प्रकारांमध्ये टॉप 65 परफॉर्मन्स अवॉर्ड्स प्राप्त झाले आहेत. जॅब्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आयएसओ 9001- 2008 आणि आयएसओ 22000- 2005 प्रमाणित कंपनी आहे. हे एक सुपर ट्रेडिंग हाऊस आहे आणि मसाले, तेलबिया, मनुका, वनौषधी आणि इतर कृषी वस्तूंचा व्यापार करते. जॅब्सची वार्षिक निर्यात 2012-13 वर्षासाठी जगभरातील 40 देशांकरिता 750 कोटी रुपये होती आणि यातील 50 टक्के निर्यात यूएसएमध्ये झाली. जॅब्सचे मसाले आणि मसाल्याच्या उत्पादनांमधील भारताच्या एकूण निर्यातीमध्ये 60 टक्के योगदान आहे. जॅब्स हा भारतातील मसाल्यांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. जॅब्स इंटरनॅशनलचे नवी मुंबईमध्ये 2 अद्ययावत उत्पादन कारखाने आहेत. यांचे गुजरात राज्यामध्ये मुद्रा आणि उंझा येथे प्रोसेसिंग युनिट्स आहेत. आंध्र प्रदेशमधील वारंगळ येथे देखील त्यांचे प्रोसेसिंग यूनिट आहे. भविष्यकालीन विस्तारासाठी कंपनीने उंझामध्ये 50 एकर्स जमीन आणि मुंद्रामध्ये अजून 50 एकर्स जमीन घेतली आहे, जिथे कंपनी विदेशी तंत्रज्ञानासह अल्ट्रा मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग युनिट्स स्थापित ­करणार आहे.