जागतिक बॅडमिंटन- सायना उपांत्यपूर्व फेरीत
सातवी मानांकित भारताच्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरूवारी महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
कॉपेनहॅगेन (डेन्मार्क)- सातवी मानांकित भारताच्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरूवारी महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिला गेम गमावूनही सायनाने विजय मिळवला. तिने १३वी मानांकित जपानच्या सायाका ताकाहाशीचा १४-२१, २१-१८, २१-१२ पराभव केला.

सायनासमोर उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित चीनच्या झ्युरुइ लीचे आव्हान आहे. सायना आतापर्यंत एकदाही या स्पर्धेत पदक जिंकू शकलेली नाही.
तत्पूर्वी, बुधवारी भारताच्या के. श्रीकांतने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याने इंग्लंडच्या राजीव ऑसेफचा २१-१८, २१-१३ पराभव केला. याउलट अजय जयरामला मात्र थायलंडच्या टॅनोनसॅककडून १७-२१, १४-२१ पराभव स्वीकारावा लागला.